धोडप
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ५५ किमी अंतरावर वडाळीभोई फाट्यावरून धोडांबे गाव ९ कि .मी आणि धोडांबे पासून ५ कि. मी अंतरावर हट्टी गाव हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावात शिरतानाच प्रचंड विस्तारलेला धोडप किल्ला आणि इखारा सुळका आपले दिसून येतो. हट्टी गाव हे खाव्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे उत्तम खवा मिळतो. गावाच्या थोडस बाहेरील बाजूस किल्ल्याच्या दिशेने धोडप किल्ला संग्रालय बनवलेल आहे. येथे उत्तम राहण्याची व्यवस्था आहे. स्थानिकांशी संवाद साधल्यास येथे जेवाणाची सुद्धा व्यवस्था होऊ शकते.
संग्रालयाच्या बाजूने एक मळलेली वाट किल्ल्याच्या दिशेने जाते. १०-१५ मिनिटे चालत गेल्यावर एक मारूतीचे मंदिर दिसून येते. येथून काही अंतर वर चढून गेल्यावर एक वाट गडाच्या दिशेने तर दुसरी वाट उजव्या बाजूने वरच्या दिशेने जाते. या वाटेने अर्ध पाऊण तास वर चढून गेल्यावर आपण हनुमान मंदिराजवळ येऊन पोचतो. येथून ईखारा सुळक्याच्या दिशेन १०-१५ मिनिटे चालत गेल्यावर आपण गोलाकार धोडप बुरुजावर येऊन पोचतो. हा बुरूज उत्तम स्थितीत आहे. येथून हट्टी गावच्या दिशेने म्हणजेच उजव्या बाजूने रानातून वाट काढत आपण धोडप किल्याच्या महादरवाज्याजवळ येऊन पोचतो. या दरवाज्याकडे गावातून येणारी वाट उद्ध्वस्त केली आहे. पण एकूणच दरवाज्याची रचना पाहता ह्या किल्ल्यावर राबता असल्याची जाणीव होते. हा महादरवाजा म्हणजे ह्या किल्ल्याच एक वैशिष्ठ आहे. हे पाहून पुन्हा हनुमान मंदिराकडे यावे समोरच आपल्याला सुस्थितित असेलेले गोलाकार बुरूज दिसून येतील. ह्या बुरुजाच्या दरवाज्यावर एक शिलालेख दिसून येतो. येथून आत आल्यावर एके पेक्षवेकलीन विहीर आणि काही मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात पुढे आपण सोनारवाडी मधून पुन्हा किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य वाटेवर येतो.
येथे खालच्या दिशेला एक पाण्याच टाक आहे बाजूला एक छोटे दुकान आहे. ह्या पाण्याच्या टाक्यात गणपतीच कोरीव मूर्ती आहे. या दुकानाच्या बाजूला वन विभागाने राहण्यासाठी शेड बांधली आहे. इथून एक वाट ईखाराच्या विरुद्ध दिशेने काही अंतर चालत गेल्यावर गणपती मंदिराजवळ येऊन पोचतो. पुढे काही अंतरावर एक सुंदर शिव मंदिर असल्याचे अवशेष दिसून येतात. या इथे एक पाण्याच टाक आहे. गणपती मंदिराच्या बाजूला एक पाण्याच आहे. हे पाहून पुढे चालत जाताना काही मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. येथे एक शिवमंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाक आहे. याच वाटेने आपण २०-२५ मिनिटे चालत गेल्यावर धोडप किल्याच्या राजमार्गावरील दरवाज्याजवळ येऊन पोचतो. पुढे काही अंतरावर तिवारी वस्ती आहे. या वस्तीच्या खालच्या बाजूस एक गोलाकार बुरूज आहे. हे सर्व पाहून पुन्हा सोनारवाडी जवळील मुख्य वाटेवर याव.

येथून किल्याच्या वाटेने जवळच एक पेशवे कालीन सुंदर विहीर आहे. हे पाहून गडाच्या दिशेने प्रस्थान करावे. वाटेत उद्ध्वस्त पायऱ्या आढळून येतात. वाटेत एका ठिकाणी लोखंडी पायऱ्या लावण्यात आल्या आहेत. पुढे वर चडून गेल्यावर २ बुरजातून आपण गडावर प्रवेश करतो. या ठिकाणी एक वाट गडाच्या कातळाला लागून डाव्या बाजूने जाते येथे गडावरील कारागृह आहे. हे पाहून पुन्हा प्रवेश द्वाराजवळ यावे. येथून वर चढून जाताना वाटेत कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. येथे एका ठिकाणी पाण्याच टाक आहे. या पायऱ्या चढून जाताना एके ठिकाणी उर्दू भाषेतील शिलालेख आढळून येतो. पुढे प्रवेश द्वारतून आपण गडावर प्रवेश करतो. ह्या ठिकाणी काही अवशेष पाहायला मिळतात. येथे पुन्हा काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून आपण गडावर प्रवेश करतो. काही अंतर चालून गेल्यावर एक पाण्याच टाक आणि उद्ध्वस्त वास्तु पाहायला मिळतात. येथून एक वाट डाव्या बाजूने गडावरील मुख्य गुहेकडे जाते. या वाटेवर लोखंडी कुंपण लावलेल आहे. आणि एक वाट सरळ वरच्या दिशेने जाते. या वाटेने वर चढून गेल्यावर एक कातळ टप्पा पार करून आपण एका आयतायकृती गुफेजवळ पोचतो. जर तुम्ही नियमित गिर्यारोहण करत असाल तर तुम्ही अगदी सहज हा कातळ टप्पा पर करून गुफे पर्यंत जाऊ शकता. पण सुरक्षेततेच्या कारणास्तव आपण एक छोटा दोरखंड वापरू शकतो. ह्या गुफेजवळ अरुंद जागा असल्याने येथे सावकाश जावे तसेच ही गुफा निगरणी साठी वापरत येत असल्याने ह्या गुफेत बसूनच जाव लागत. हा एक वेगळा अनुभव येथे मिळतो. हे पाहून पुन्हा गडावरील मुख्य गुहेकडे प्रस्थान करावे. ह्या गुहेत देवीच मंदिर आहे आणि गुहेत २५-३० जणांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. आणि गडाच्या बाहेरील बाजूस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. गुहे समोरील माचीवर सरळ चालून पुढे गेल्यावर ह्या गडावरील सर्वात मुख्य आकर्षण असलेली मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच पाहायला मिळते. आणि येथून गडाच पिंडीच्या आकाराच दर्शन घडून येत. हे सगळ पाहून आपण गड उतरण्यास सुरवात करावी. गडावर पाहण्यासारखी खुप ठिकाण असल्याने दोन दिवस वेळ काढून गड भ्रमंती करावी. वेळेच काटेकोर नियोजन केल तर एका दिवसात हा किल्ला पाहता येतो परंतु तुमची दमछाक होऊ शकते.
|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||