बुधवार, २३ मार्च, २०२२

किल्ले सोंडाई

 किल्ले सोंडाई 

रायगड जिल्हा आणि मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला गिर्यारोहणासाठी आणि भटक्यांसाठी नेहमीच आकर्षित राहिला आहे कारण आजूबाजूला असणारा नयनरम्य निसर्ग. विशेषतः पावसाळ्यात आणि किमान डिसेम्बर महिन्यापर्यंत येथील वातावरण हे प्रसन्न आणि हिरवेगार असते. जुन्या मुंबई पुणे मार्गावर कर्जत फाट्यावरून कर्जत च्या दिशेने जाताना डाव्याबाजूला बोरगाव चा एक रस्ता जातो ह्याच मार्गाने पुढे गेल्यावर सोंडेवाडी हे गाव येते. या मार्गाने येताना तुम्हाला डाव्या बाजुला मोरबे धरण नजरेस पडते. या धरणाच्या पलीकडे आपल्याला इर्शाळगड, प्रबळगड आणि माथेरानचा डोंगर नजरेस पडतो. साधारणतः कर्जत पाट्यावरून सोंडेवाडी पर्यंत 10 किमी अंतर आल्यावर आपण किल्ले सोंडाई च्या पायथ्याजवळ येऊन पोचतो. येथूनच पुढे चांगेवाडी धबधबा असल्याने इथे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते.


पठारावरून नजरेस पडणारा गडमाथा

पर्यटक आणि गिर्यारोहक यांची रहदारी सतत असल्याने ह्या गडावर जाणारी वाट सहज नजरेस पडते. १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोचतो. येथून आपल्याला गड माथ्यवरील झेंडे दिसुन येतात.वाटेत ५-६ टपऱ्या असल्याने पिण्याचे पाणी, नाश्ता आणि जेवणाची सोय आरामात होऊ शकते. 

इथून पुढे कातळ कडा चढुन जाताना कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. काही अंतर चालत गेल्यावर आपण पुन्हा एका पठारावर येतो. येथे कातळात खोदलेली २ पाण्याची टाक आहेत. या टाक्यात पाणी असते पण ते सध्या पिण्यायोग्य नाही. ह्याच पठारावरून उजव्या बाजुला एक मुख्य डोंगरापासून वेगळा उभा असलेला खडक लक्ष वेधुन घेतो. गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार तो देव असल्याचं सांगण्यात येत. येथून पुढे जाण्यासाठी लोखंडी शिडी लावलेली आहे. शिडी चढुन वर गेल्यावर पुन्हा एक पाण्याचं टाकं आणि त्याच्या बाजुला छोटीशी गुफा आहे. हे पाण्याचं टाकं २ खांबी आहे. येथून वर चढुन गेल्यावर आपण गड माथ्यावर येऊन पोचतो. गडमाथा अरुंद आहे इथे सोंडाई देवीच्या मूर्ती आहेत. गडमाथ्यावरून आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग नजरेस पडतो. साधारणतः दोन तासात आपण गड फिरून पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरवात करू शकतो. गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय नाही.

पाण्याचं टाकं

पाण्याचं टाकं

लोखंडी शिडी 
पाण्याचं २ खांबी टाकं 

छोटीशी गुफा
छोटीशी गुफा

सोंडाई देवीच्या मूर्ती 

डाव्या बाजूने - पुरषोत्तम, धनंजय, प्रशांत, शिवाजी , दीपक, सिद्धेश


|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा