शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

भोरगिरी, चाकणचा भुईकोट, भंडारा डोंगर, इंदुरीचा किल्ला

 भोरगिरी


किल्ले भोरगिरी हा किल्ला गिरिदुर्ग ह्या किल्ल्याच्या प्रकारात येतो. भीमाशंकर डोंगर रांगेत येणारा मध्यम श्रेणीचा हा किल्ला पुणे जिल्ह्यात येतो. किल्ले भोरगिरीला जाण्यासाठी आम्ही बोरिवली (मुंबई) वरून रात्री 9.30 वाजता आमचा प्रवास सुरु केला आणि पहाटे 4.00 वाजता भोरगिरी गावात कोटेश्वर मंदिराजवळ पोचलो. भीमा नदीच्या काठी असलेले प्राचीन कोटेश्वर मंदिर झंज राजाने बांधलेलं असावे असे म्हटले जाते. सध्या तेथे मंदिराचा काही भाग तसाच ठेऊन नवीन मंदिर उभारलेलं आहे. पण प्राचीन मंदिराचे काही अवशेष मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात. ह्याच मंदिराच्या सभागृहात आम्ही पहाटे आमच्याकडील तंबु ठोकून काही काळ विश्रांती घेतली. पहाटे साधारणतः 7 वाजता उठुन आम्ही मंदिर आणि मंदिराच्या  भोवतालचा परिसर पाहुन घेतला. पावसाळा असल्याने बाहेरील वातावरण प्रसन्न आणि हिरवेगार होते आणि भीमा नदीही दुथडी भरून वाहत होती.
प्राचीन कोटेश्वर मंदिर
मंदिराचा गाभारा
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना
मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना
गाभाऱ्यासमोरील कासव
गाभाऱ्यासमोरील कासव
गाभाऱ्याबाहेरील शिल्प
गाभाऱ्यासमोरील नंदी
गाभाऱ्याबाहेरील गणेशाची मूर्ती
गाभाऱ्याबाहेरील मूर्ती
गाभाऱ्याबाहेरील मूर्ती
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
मंदिराचे अवशेष
कोटेश्वर मंदिर परिसरातील मंदिर
मंदिर
कोटेश्वर मंदिराच्या रस्त्यावरून पुढे नदीवरील पुल ओलांडून उजव्या बाजूने एक कॉंक्रिट चा रस्ता गावातून वरच्या दिशेने जातो इथे एक मंदिर आहे तिथे आपण आपले खाजगी वाहन उभे करू शकतो. पुढील ट्रेक आपल्याला पायीच करायचा आहे. एक मळलेली पायवाट आपल्याला गडावरील पहिल्या गुहेकडे घेऊन जाते. ह्या पहिल्या गुहेत देवीचे मंदिर आहे आणि पुढील गुहेत शिवलिंग आहे. ह्या गुहेतुन आपल्याला दुथळी भरून वाहणारी नदी आणि काही नयनरम्य धबधबे दिसुन येतात. हे सगळं पाहुन झाल्यावर उजव्या बाजूने एक वाट आपल्याला गडावर घेऊन जाते. काही अंतर वरच्या दिशेने चालत घेल्यावर एक तटबंदी नजरेस येते. थोडं अजुन वर चढून गेल्यावर पाहिलं पाण्याचं टाक नजरेस पडत. ह्या पाण्याच्या डाव्या बाजूने सामन्तर चालत गेल्यावर 3 पाण्याची टाक दिसुन येतात येथील तिसऱ्या पाण्याच्या टाकीजवळ एक मूर्ती पाहायला मिळते. ह्याच वाटेने पुढे चालत गेल्यास अजून एक तटबंदी दिसुन येते. आणि इथुन वरच्या दिशेनं गेल्यास आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोचतो. पहिल्या पाण्याच्या टाकी जवळुन उजव्या बाजूने आल्यास आपल्याला अजुन एक पाण्याचं टाक दिसुन येत. या पाण्याच्या टाक्यात एक विरगळ पाहायला मिळते. काही अंतर पुढे चालत गेल्यावर एक शिवलिंग आणि काही अवशेष दिसुन येतात. इथुन थोडंसं खाली डाव्या बाजुने चालत गेल्यास शरभ शिल्प दिसुन येते. ह्या वाटेने काही पावलं मागे आल्यावर एक वाट खाली उतरते ह्या वाटेने खाली गेल्यास एक गुहा आणि मंदिर आहे. हे पाहुन झाल्यावर पुन्हा शरभ शिल्पाच्या दिशेनं गेल्यास दरवाज्याचे अवशेष दिसुन येतात. हे पाहुन झाल्यावर पुन्हा शिवलिंग आहे तिथे यावं. इथुन वर जाणारी वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. हे सगळं पाहुन झाल्यावर आपण आल्या वाटेने गडावरून खाली उतरावे. गडाचा परिसर हा भीमाशंकर अभयारण्य परिसरात येतो. ह्या इथे तरस हा वन्यजीव असल्याचा फलक शासनाने लावलेला आहे. भोरगिरी पाहुन झाल्यावर आम्ही चाकणचा भुईकोट किल्ला पाहण्यास निघालो.
किल्ले भोरगिरीचा नकाशा
गुफेतील शिवलिंग
पाण्याच टाकं
पाण्याच टाकं
वैभवमहालक्षी मातेच मंदिर असलेली गुफा
वैभवमहालक्षी माता
वैभवमहालक्षी मातेच्या गुफेमधुन दिसणारे दृश्य
वैभवमहालक्षी मातेच मंदिर असलेली गुफा
शिवलिंग
शिवलिंग असलेली गुफा
विरगळ असलेलं पाण्याचं टाकं
पाण्याच टाकं
पाण्याच टाकं
शिवलिंग
शिल्पं
शिवलिंग
अवशेष
पाण्याच टाकं
शरभ शिल्प

शिल्प
गुहा

अवशेष
अवशेष
पाण्याच टाकं
पाण्याच टाकं
पाण्याच टाकं
पाण्याच टाकं
अवशेष
अवशेष

शासनाने लावलेलावन्यजीव असल्याचा फलक 

चाकणचा भुईकोट

भोरगिरी पासुन चाकणचा किल्ला साधारणतः 64 किलोमीटर अंतरावर आहे. इथे खाजगी वाहनाने आपण प्रवास करणार असु तर पावणे दोन तासात आपण किल्याच्या आवारात पोचतो. किल्ला भुईकोट असल्याने आणि किल्याच्या आत गाडी जात असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हा किल्ला तसा प्राचीन आहे आणि ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार आहे. पण सध्याची किल्ल्याची स्थिती पाहता आपण हा किल्ला सुद्धा जतन करू शकत नाही हि आपली शोकांतिका आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची साक्ष आपल्याला किल्यात प्रवेश करतानाच येते. किल्ल्याच्या मध्य भागातुन येण्या-जाण्या करण्यासाठी सिमेंट चा रस्ता बांधण्यात आला आहे आणि हा रस्ता किल्याच्या भोवती असलेलं खंदक बुजवुन बांधला असावा असे लक्षात येते. अश्या वेळेस असे लक्षात येते कि आपले पुरातत्व विभाग निद्रा अवस्थेत असताना हा रस्ता बांधला असावा. हा  किल्ला पुर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशव्दार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्प पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलीकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो.किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरिल कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात.
मंदिराच्या विरुद्ध दिशेला ठेवलेलीतोफ
मंदिराच्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या तोफा
मंदिराच्या दोन्ही बाजूला ठेवलेल्या तोफा
मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
अवशेष
अवशेष
अवशेष
अवशेष
अवशेष
प्रवेशव्दार
किल्याच्या भोवती प्रवेश करतांनाअसलेलं  खंदक आणि तटबंदी
किल्ल्याच्या मध्य भागातुन येण्या-जाण्या करण्यासाठी सिमेंटचा रस्ता
तटबंदी
तटबंदी
जंग्यांची रचना
तटबंदी
तटबंदी
सह्याद्रीच्या कडा

भंडारा डोंगर

चाकणचा किल्ला पाहुन आम्ही पुढे भंडारा डोंगर ह्या तीर्थक्षेत्री जाण्यास निघालो. इथे पोचण्यासाठी चाकणच्या किल्ल्यावरून साधारणतः 19 किमी पाऊण तास प्रवास करून आम्ही डोंगरावर येऊन पोचलो. ह्या इथे जगद्गुरू संत तुकाराम महारांजांचे मंदिर आहे आणि नवीन मंदिराचे बांधकाम देखील सुरु आहे.  वारकरी संप्रदायाची मंडळी इथे देखभाल करतात आणि अनेक धार्मिक सोहळे होतात तसेच राज्याच्या कानाकोपºयांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वाºयाची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजूबाजुला हिरवाई दिसून येत होती. या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे. या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साºया विश्वाला मार्गदर्शक असणाºया गाथेची निर्मिती केली होती. मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे. या स्तुपावरून हि बौध्द लेणी हिनयान कालिन असावीत.लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे टाक आहे. हे पाहुन पुन्हा वर यावे. भंडारा डोंगराचा घाट रस्ता नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवावी.
मंदिराच्या उभारणीसाठी सह्याद्री कडा परिवारातर्फे  देण्यात आलेला खारीचा वाटा
बौध्द्कालिन लेणी
मंदिराचे बांधकाम

इंदुरीचा किल्ला

भंडारा डोंगर उतरून तळेगावकडे जाताना 5 कमी अंतरावर इंदोरी हे छोटे गाव लागते. तेथे इंदोरीचा भुईकोट किल्ला आहे. छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे यांनी इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. 
सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१ मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली, त्याला "इंदुरीचा किल्ला " ,सरसेनापतींची गढी" या नावानेही ओळखले जाते. इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण दरवाजाच्या वरचा बाजूस जातो. येथे झरोके असलेला हवामहाल आहे.किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. हि सगळी ठिकाण आपण जर वेळेचं योग्य नियोजन केलं तर एका दिवसात पाहता येतात. हे सगळं पाहुन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशव्दार
प्रवेशद्वारावरील शिल्प
झरोके असलेला हवामहाल
अवशेष
किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश
कडजाई देवीचे मंदिर
सह्याद्रीच्या कडा

|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा