शनिवार, २९ जानेवारी, २०२२

श्री मलंगगड

 श्री मलंगगड

ठाणे जिल्हा आणि मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला गिर्यारोहणासाठी नेहमीच आकर्षित राहिला आहे. कल्याण पासुन सुमारे 16 किमी अंतरावर असलेला हा किल्ला पीर माची , सोने माची आणि बालेकिल्ला अश्या तीन टप्प्यात आहे.

सर्वात पहिला टप्पा येतो तो पीर माची, ह्या माचीवर दर्गा असल्याने येथे मुस्लिम समाजाची वर्दळ आहे. गडाच्या पायथ्यापासून या दर्ग्यापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत आणि दोन्ही बाजूला दर्ग्यापर्यँत दुकाने आहेत. यातली बरीचशी दुकाने अनधिकृत आहेत पण शासनाने इथे कानाडोळा केलेला दिसुन येतो. वाटेत तुम्हाला बरीचशी लहान मोठी मंदिर पाहायला मिळतील ह्यातली काही मंदिर पुरातन आहेत तर काही अलीकडच्या काळात बांधली गेली आहेत. ह्या माचीवर गडाचे अवशेष आहेत, पण एकूणच माचीवर ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाचा वावर आहे त्यामुळे ह्या माचीवर फिरण्यास आपल्याला इच्छा होणार नाही आणि ह्या माचीवर असलेल्या इतिहासाच्या खुणा पुसून टाकण्याचा प्रयत्न राजरोस सुरु आहे कि काय असा दाट संशय येतो आणि शासन हि ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे असंच म्हणावं लागेल.





दर्ग्या पर्यंत पोचल्यावर, जर तुम्ही दर्ग्याच्या समोर उभे असाल तर तुमच्या उजव्या बाजूला एका गल्लीतुन वाट वर सोने माची कडे जाते. तिथे तुम्ही कोणालाही विचारलात तर ते वाट दाखवु शकतील. 15-20 मिनिटे वर चढुन गेलात कि डाव्या बाजूला एक गुफा दिसुन येते. ह्या ठिकाणी  10-15 जणांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते पण ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही ती आपण स्वतः करावी. इथपर्यंत पोचल्यावर व इथुन पुढे आपल्याला इतर गड किल्यांवर जसे वातावरण असते तसे असल्याचा आनंद मिळतो.

गुफेच्या बाहेरून रात्रीच्या वेळेस
दिसणारा पीर माचीचा परिसर
गुफे बाहेर तंबु लावण्याची जागा















गुफा डाव्या बाजूला ठेऊन उजव्या बाजूने थोडंसं वर गेलं कि तिथे एक फलक लावला आहे "उपर आना मना है" हा फलक कोणी आणि का लावला असावा हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. ह्याच फलकाच्या बाजूने वर गेल्यास उध्वस्त पायऱ्या आढळुन येतात. ह्या पायऱ्या चडून वर गेल्यास आपण सोने माची वर पोचतो.

फलकामागुन सोने माचीवर जाण्यासाठी
कातळात कोरलेल्या पायऱ्या
सोनेमाची कडे जाणारी वाट
सोने माचीवर येताना तुम्ही कातळात कोरलेल्या पायऱ्या चडून सोनेमाची वर पोहचता, या ठिकाणी दरवाजा असण्याची शक्यता असु शकते. सोने माचीवर पोहचताच काही पावलांच्या अंतरावर चोर दरवाजा आहे. ह्या चोर दरवाज्यातुन पायऱ्या उतरून खाली गेलो कि निसर्गाचं नयनरम्य अनुभव घेता येतो.

सोने माचीवर येताना आढळुन
येणाऱ्या दरवाज्याचे अवशेष

चोर दरवाजा

चोर दरवाजा

चोर दरवाज्यातुन दिसणारा
नयनरम्य निसर्ग
इथून पुन्हा माची वरून सरळ चालत पुढे गेलो कि पडक्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. सरळ पुढे गेलो कि दोन सुकलेल्या पाण्याची टाक आहेत. थोड़ पुढे उजव्या बाजूला उध्वस्त पायऱ्या आहेत आणि एक मोठा बुरुज आहे, हे पाहून पुन्हा मागे येताना तुम्हाला बाले किल्याचा कडा नजरेस पडेल.

बुरुजावरून येताना दिसणारा बालेकिल्ला
आणि पडक्या वाड्याचे अवशेष
वाड्याजवळील बुरुज आणि बालेकिल्ला
बालेकिल्ला
                                                                    
पाण्याची टाक






बुरुज












































बुरुज
बुरुज
उध्वस्त पायऱ्या
ह्या कड्याच्या उजव्या बाजूने चालत गेल्यास एक पाण्याचं टाक आहे. हे पाहुन पुन्हा मागे यावं. कड्याच्या डाव्या बाजूने पुढे जावं थोडंसं अंतर चालत गेल्यावर वरच्या बाजूला दोन लोखंडी पाईप लावलेलं दिसतील ह्या पाइपा पर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या आहेत. इथपर्यन्त तुम्ही जाऊ शकता पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहणाचं साहित्य आणि तंत्र अवगत असणं आवश्यक आहे.
कातळातल्या पायऱ्या
पाण्याचं टाक


दोन लोखंडी पाईप
इथुन पुढे जाताना वाटेत कातळातल्या पायऱ्या आढळुन येतात या पायऱ्या वर चढुन वर गेल्यावर पुन्हा एक मोठा साखळदंड आणि एक लोखंडी पाईप लावला आहे. ह्या साखळ दंड आणि पाईपच्या साह्याने आपल्याला वर जावे लागते. वर पुन्हा काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पुढे एका निमुळत्या वाटेने वर गेल्यावर आपण बालेकिल्यावर येऊन पोचतो. बालेकिल्ल्यावर समोरच एक वाडा दिसून येतो. वाड्याच्या मागच्या बाजुला 4-5 पाण्याच्या टाक्या आहेत. टाक्यांच्या बाजूने वर गेल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचतो. इथुन आपल्याला सोन माची वरील आणखीन 2 पाण्याच्या टाक्या दिसतील आणि गडाच्या आजूबाजूचा सम्पूर्ण प्रदेश नजरेस पडतो. हे सगळं पाहुन झाल्यावर परतीच्या प्रवासाला सुरवात करू शकतो.
कातळातल्या पायऱ्या
साखळदंड आणि एक लोखंडी पाईप

























पडक्या वाड्याचे अवशेष आणि पाण्याचं टाक
पाण्याचं टाक
आणि पाण्याचं टाक
गडाच्या आजूबाजूचा प्रदेश

आणि पाण्याचं टाक
गडाच्या आजूबाजूचा सम्पूर्ण प्रदेश

साधारणतः एका दिवसात किंवा आदल्या रात्री गुफेपर्यंत जाऊन हा गड आपण पाहु शकतो. जर तुमच्याकडे गिर्यारोहणाच साहित्य नसेल तर तुम्ही सोने माची पाहुन एका दिवसात हा किल्ला करू शकता


|| हर हर महादेव ||
|| जय भवानी ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||


1 टिप्पणी:

  1. Some might have potentially been used in the days earlier than fashionable random quantity generator expertise generated outcomes. Regardless, there are some slot machine myths that merely refuse to go away, regardless of proof that they are merely superstitions or not related. Here are variety 바카라사이트 of the} common myths, which have been debunked. Siberian Storm has an unconventional setup, with the number of rows altering across the 5 reels to create a diamond form and 720 methods to win. The winter themed slot boasts a free spins bonus, which awards as much as} 96 free plays.

    उत्तर द्याहटवा